Thursday, May 21, 2026

हिंदू युवकांकडून शनी चौथऱ्याचे शुद्धीकरण

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनिचौथरा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर बुधवार दि.२१ रोजी गैरहिंदू कारागीर दिसल्यानंतर आज सायंकाळी भाजपचे युवानेते ऋषिकेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू युवकांनी चौथरा व परिसराचे शुद्धीकरण केले, तसेच विश्वस्त मंडळाचा जाहीर निषेध केला.

शनिशिंगणापूर येथे बुधवारी शनिचौथऱ्यावर गैरहिंदू कारागीर
सुशोभीकरणाचे काम करीत असताना भाजपचे शेटे यांनी देवस्थान प्रशासनास जाब विचारला होता. मांसाहार करणाऱ्या कारागिरांमुळे येथील पवित्रतेला गालबोट लागल्याने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सकल हिंदू समाजातील युवक घोषणा देत मंदिर परिसरात आले. चौथऱ्यावर जल, गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. शनी मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!