नेवासा
नेवासा पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्ह्यातील वाहने व बेवारस 46 वाहने नेवासा पोलिसांनी मूळ मालकांच्या ताब्यात दिली.
यबाबद माहिती देताना नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परीक्षाविधिन पोलीस उपआधीक्षक संतोष खाडे म्हणाले की, पोलीस ठाणे नेवासा आवारात लावण्यात आलेले गुन्ह्यातील व बिनधनी ( बेवारस ) वाहने हे दि. 23 मे रोजी सदर वाहनांचे कागदपत्रे पाहून व शहानिशा करून मूळ मालकांच्या ताब्यात देनेचा उपक्रम संपन्न झाला आहे. यामध्ये एकूण 46 वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
अजूनही काही वाहने पोलीस स्टेशन आवारात असून मूळ मालकांनी कागदपत्रे सादर करून आपले वाहन ताब्यात घेण्याबाबत आव्हान करण्यात आले आहे.