गुहा वार्ताहर राहुल कोळसे:राहुरी तालुक्यातील गुहा येथे गेल्या तीन – चार दिवसांपासून विजपुरवठा खंडीत होत आहे. पावसाचे वातावरण झाले किंवा थोडासा रिमझिम पाऊस आला तरी लगेच वीजपुरवठा तासनतास खंडीत केला जात आहे. एकदा खंडीत झालेला वीजपुरवठा चार चार तास वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुहा गावात दिवसभरात व रात्री सुरळीत वीजपुरवठा होत नाही. रात्री वाड्या वस्तीवर वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिका मध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. खंडीत होणाऱ्या वीजपुरवठा मुळे शेतकऱ्यांचा पशुधनाची पिण्याच्या पाण्याची तसेच रात्री जात असलेल्या वीजपुरवठा मुळे अडचण होत आहे.
देवळाली प्रवरा उपविभागीय महावितरण अंतर्गत येणाऱ्या गुहा गावाला चार दिवसापासून वीज पुरवठा अनियमित होत आहे याकडे महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष करत आहे. गुहा गावठाण व वाड्या वाड्या वस्तीवर पावसापूर्वी करण्यात येणारी ट्री कटिंग, डीटीसी, केबल कट आउट , लुच तारा ,झुकलेले पोल यांचे कुठेही काम करण्यात आले नसून यामुळे वादळी वाऱ्यामध्ये वीजपुरवठा खंडित होऊन जीवितहानी होण्याची खूप मोठा धोका आहे . कामाविषयी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला दुरूस्ती साहित्य मटेरियल मिळत नाही आम्ही कुठून करणार अशी उडवाउडवीची उत्तर मिळत आहे. याविषयी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून गुहा गावाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा गुहा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
[ गुहा गावठाण वरील Ag फिडरवरील डीटीसी चा महिन्यापूर्वी पोल मोडून चार गाळे तारा जमिनीवर पडून असून त्याचे कुठलेही काम झाले नाही याविषयी विचारले असतात कर्मचारी उपलब्ध नाही अशी उत्तर मिळते. काही दुर्घटना घडल्यास या घटनेला कोण जबाबदार राहील]
—————————————————————————
[ गुहा गावात काही दिवसांपासून गावात अनियमितपणे वीजपुरवठा होत आहे. यामुळे काही शासकीय कामे तसेच महाडिबीटी सारखे कामे आँनलाईन असल्यामुळे वीजपुरवठा असल्याशिवाय ही कामे करता येत नाही. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे अडचणी येत आहे.
शरद बाळासाहेब वाबळे]
————————————————————————-
[ गुहा गावात काही ठिकाणी विजेचे पोल वाकले आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. काही दुर्घटना घडली तर या सर्व प्रकाराला महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील.
कैलास कोळसे]