Thursday, May 21, 2026

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना संचालक पदी विकास नन्नवरे यांची बिनविरोध निवड

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदीविकास चंद्रभान नन्नवरे (रा.आपेगाव, ता.शेवगाव) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मतदार संघ क्र. ३ मधील अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गातील संचालक
दीपक तुळशीराम नन्नवरे यांचे निधन झाल्याने नैमित्तिक रिक्त झालेले संचालक पद भरण्यासाठी अध्यासी अधिकारी
प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२८ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कारखाना अतिथीगृहामधील सभागृहात संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नैमित्तिक रिक्त झालेले संचालक पदासाठी विकास चंद्रभान नन्नवरे
यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी श्री.गोंदे यांनी केली.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, संचालक अड.देसाई देशमुख,आ.विठ्ठलराव लंघे, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, बबनराव भुसारी,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, पंडितराव भोसले, सखाराम लव्हाळे, शंकरराव पावसे, गोरक्षनाथ गंडाळ, सौ.लताताई अशोकराव मिसाळ, सौ.रत्नमाला काशिनाथ नवले, सौ.ताराबाई हनुमान
जगदाळे यांचेसह प्रादेशिक सह संचालक (साखर) कार्यालयाचे अधीक्षक उमेश कुलकर्णी, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ, विष्णू जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी,प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, लीगल ऑफिसर सुनील शिंदे,विलासराव लोखंडे, डॉ.सुधाकर लांडे,राजेंद्र देशमुख, तुषार नन्नवरे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!