Monday, October 18, 2021

लवकरच लग्न होणार मात्र नियतीने वेगळाच खेळ मांडला अन् क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शीतल राजेंद्र देठे वय २२ तिचा सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. लवकरच लग्न होईल, पतीबरोबर सुखाचा संसार सुरू होईल, अशी सुखस्वप्ने तिने पाहिली. मात्र, नियतीने वेगळाच खेळ मांडला. आणि क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले आणि तिच्या आनंदाला दृष्ट लागली.

राजेंद्र देठे (वय २२, रा. देवळाली प्रवरा) असे मृत तरुणीचे नाव आहे. अवघी एक एकर जमीन असल्याने, तिचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. आजोबा गायींचा गोठा सांभाळतात. जानेवारीमध्ये शीतलचा साखरपुडा झाला. लग्नाची तयारी झाली. फक्त तारीख काढणे बाकी होते. मात्र, कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट लागली.

सोमवारी (ता. १२) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान देवळाली प्रवरा येथे राहत्या घरात शीतलने विषारी औषध प्राशन केले. एवढ्यावरच ती थांबली नाही. घराच्या शेजारी असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. तिला तत्काळ लोणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

काल (ता.१४) मंगळवारी दुपारी देवळाली प्रवरा येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजले नाही बुधवारी सायंकाळपर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!