Sunday, December 7, 2025

देवगांवचे सुपुत्र एसीपी संभाजी मुरकुटे यांचा सेवापूर्ती सन्मान

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा  तालुक्यातील देवगावचे सुपुत्र व मुंबईतील कुर्ला येथील पोलीस सहायक आयुक्त संभाजी मुरकुटे हे पोलिस दलातील प्रदीर्घ सेवे नतंर निवृत्त झाल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांचे हस्ते त्यांचा सेवापूर्ती सन्मान करण्यात आला.

त्यांनी सीबीआय आर्थिक गुन्हे शाखा, बीकेसी, मुंबई येथेही प्रतिनियुक्तीवर ८ वर्षे काम केले आहे आणि केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पदक ( गुणवत्तापूर्वक सेवेबाबतचे), केंद्रीय गृहमंत्री पदक ( कौशल्य पूर्वक तपासाबाबतचे),
सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी ( सुवर्णपदक) ( सीबीआय अंतर्गत),आणि महाराष्ट्र पोलीस दलातील डी जी insignia या पदकाने गौरविण्यात आले आहे.

श्री.मुरकुटे हे मूळचे नेवासा तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असून ते १९९५ रोजी पोलीस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले होते. सध्या ते मुंबई येथे कार्यरत होते. पोलिस सेवेच्या काळात बच्छानीनगर इमारत दुर्घटना, फरार असलेल्या १०० पेक्षा जास्त आरोपींची अटक, डॉईच बँकेतील अपहार, अत्याचार, खून प्रकरणातील आरोपींची अटक यासह अनेक संवेदनशील व सायबर क्राईम संदर्भातील गुन्ह्यांच्या तपासात मुरकुटे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना वर नमूद प्रमाणे गौरविण्यात आले आहे.सध्या ते बृहन्मुंबई येथे सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.

यावेळी बोलताना श्री.मुरकुटे म्हणाले की, नियत वयोमानानुसार ३१/५/२०२५ रोजी सेवानिवृत्त झालो आहे. पोलिस खात्याने आम्हाला खूप काही दिले. खास करून-मान, सन्मान, अवार्ड, रिवॉर्ड, गोल्ड मेडल आणि जनतेचे प्रेम मिळाले. सीबीआय मधे भारतभर काम करण्याची संधी मिळाली आणि आम्ही सुद्धा संस्थेला अभिप्रेत असलेले काम केले. सर्वात शेवटी पुन्हा मुंबई पोलिस मधे काम केले.पोलीस विभागाच्या आम्ही सदैव ऋणात राहू इच्छितो.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!