Saturday, May 16, 2026

सौंदाळा ते नागापुर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीनेच सुरू असल्याचा निर्वाळा

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सूरु असलेल्या सौंदाळा ते नागापुर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीनेच सुरू असल्याचा निर्वाळा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता शेखर गुंजाळ यांनी केला आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सूरु असलेल्या सौंदाळा ते नागापुर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार
सौंदाळा येथील रामकिसन श्रीपती आरगडे यांनी केली होती, त्या पार्श्वभूमिवर अभियंता शेखर गुंजाळ यांनी या बाबद माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सौंदाळा ते नागापूर रस्त्याचे काम सुरू असून सदर रस्त्यावर काही ठिकाणी असलेले जमीन मालकांचे वादामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागण्यास अनेक अडचणी होत्या. परंतु यावर पंतप्रधान ग्रामसडक विभाग आहिल्यानगर, सौंदाळा व नागापूर गावचे सरपंच, गावातील नागरिक यांनी मध्यस्थी करून वाद असलेल्या शेतकऱ्यांला व्यवस्थित समाजावून सांगून सदर शेतकऱ्यांचे वाद मिटवून सदर काम मार्गी लावून प्रत्यक्ष कामास सुरुवात केलेली आहे.
परंतु सदर शेतकरी सदर कामात पुन्हा अडथळे आनण्याचे व काम बंद करून
शासकीय यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे.काम अंदाजपत्रकानुसार सुरू असून कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्यात येत आहे. काम करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सहकार्य केले तर काम वेळेत पूर्ण करून घेता येईल.तसेच सदर रस्त्याचे काम हे विनिर्देशा प्रमाणे चालू असून वेळोवेळी बाह्य यंत्रणे मार्फत गुणवत्ता तपासण्यात आलेली असून सदर रस्त्याच्या कामावर समाधानकारक शेरा आलेला आहे असे ही श्री. गुंजाळ यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!