Monday, April 13, 2026

नेवासा तालुक्यातील पिक-मालमत्ता नुकसानीची आ.विठ्ठलराव लंघे कडून पहाणी

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यात ११ जून रोजी वादळ-वाऱ्याने
झालेल्या पीक व मालमत्ता नुकसानीची आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली.

नेवासा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले आहेत. विजेचे खांब व झाडे उन्मळून पडले आहेत. या आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुका प्रशासनासह प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत,जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल.

यावेळी नेवासा तहसीलदार डॉ.संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, महावितरणचे उपअभियंता बडवे व महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सायम, बी. टी. सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!