अहिल्यानगर, दि.१९-
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. २१ जून २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार असून २० ते २७ जून या कालावधीत योग आणि आरोग्य शास्त्र विषयक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी रा.दा. शिंदे यांनी दिली आहे.
दि. २० जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे उद्योजक, वक्ता व लेख एन.बी. धुमाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे. शासकीय सुट्टया वगळता हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिका, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्यासह वाचक सभासदांनी घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.