Monday, March 30, 2026

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/ प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कारासाठी सत्यशोधकीय व प्रागतिक विचारांचा प्रसार करणारे ग्रंथ पाठविण्याचे आवाहन समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी केले आहे.

अधिक माहिती देताना श्री.पाटील म्हणाले की,दरवर्षी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी  २० डिसेंबर रोजी सत्यशोधकीय, प्रागतिक विचारांचा प्रसार करणाऱ्या ग्रंथांसाठी विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, संशोधनपर, इतिहासविषयक, सामाजिक,सांस्कृतिक,वैचारिक, बालसाहित्य,अनुवादीत आदी प्रकारांतील ग्रंथांच्या दोन प्रती सचिव, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी ता. नेवासा जि. अहमदनगर (दूरध्वनी क्रमांक ९८२२ ८२२० ९५) या पत्त्यावर  ३० नोव्हें २०२५ पूर्वी पाठवाव्यात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!