अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
देशी-विदेशी अवैध दारु बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई करुन २ लाख २२ हजार १७८ रुपये किंमतीची दारू जप्त करून ०२ आरोपी जेरबंद करण्याची धडाकेबाज कारवाई डीवायएसपी संतोष खाडेंच्या नेतृत्वाखलील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडाकेबाज
लोणी पोलीस स्टेशन व आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध्य धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
वरील आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ.खाडे हे दि.२०/०६/२०२५ रोजी लोणी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हसनापुर रोडवरील हॉटेल साईछत्र, लोणी बुद्रुक, ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे हॉटेल मालक हे अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारु कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेला इसम पळून जाऊ लागला असता त्यास पोलीस पथकाने पाठलाग करुन पकडून त्यास विश्वासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर प्रकाश पावसे वय-३४ वर्षे रा.सोनार गल्ली, लोणी बुद्रुक, ता. राहाता जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याकडे मिळून आलेले विविध प्रकारच्या देशी विदेशी दारुच्या साठ्याबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अवैधरित्या विक्री करण्याचे हेतूने जवळ बाळगला असून तो स्वत: मालक असल्याचे सांगितले.
त्याचे कब्जात मिळून आलेला एकूण १ लाख ४६ हजारब४०८ रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारु, बियरच्या बाटल्या असा व २० हजार ३८० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ६६ हजार ७८८ रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून जप्त केला.
तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.संतोष आ. खाडे यांनी विशेष पोलीस पथकासह आश्वी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सादतपुर गावाचे शिवारात लोणी ते संगमनेर रोडवर हॉटेल साईसागर येथे हॉटेल मालक हे अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारु कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेला इसम पळून जाऊ लागला असता त्यास पोलीस पथकाने पाठलाग करुन पकडून त्यास विश्वासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आतिष भाऊसाहेब गायकवाड वय-४० वर्षे रा. विठ्ठलनगर लोणी बुद्रुक ता. राहता जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याकडे मिळून आलेले विविध प्रकारच्या देशी विदेशी दारुच्या साठ्याबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अवैधरित्या विक्री करण्याचे हेतूने जवळ बाळगला आहे. त्याचे कब्जात मिळून आलेला एकूण ४२ हजार ०९० रुपये किंमतीचा देशी-विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या व १३ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५५ हजार ३९० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून जप्त केला.
या प्रमाणे लोणी पोलीस स्टेशन हद्दीत व आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून एकूण २ लाख २२ हजार १७८ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ०२ आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३७१/२०२५ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे तर आश्वी पोलीस स्टेशनला गु.र.नं. १२०/२०२५ मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग वैभव कलुबर्मे, अपर. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग
श्री.सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉ जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली असुन पुढील तजवीज संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.