नेवासा/प्रतिनिधी
मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष युवा नेते उदयनदादा गडाख यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर कडे भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढीवारी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी घेऊन वारकरी भाविक भक्तांसोबत चालण्याचा आनंददायी अनुभव घेतला.
उदयन गड़ाख यांनी दिंडीमध्ये पायी चालणारे वारकऱ्यांमध्ये सहभागी होऊन टाळ, मृदुंगाचा आवाज, अभंग, हरीनामाचा जयघोष करत चालणाऱ्या वारकऱ्यांमधील भक्ती, एकता आणि समतेची भावना वाढीचा एक वेगळाच प्रत्येय मिळाला.
यावेळी उदयनदादा गडाख यांनी माऊलींना पुष्पहार अर्पण करून गाथामूर्ती ह.भ.प.रामभाऊ महाराज राऊत व वेदांताचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के यांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
इमामपूर येथील घाटामधून श्री क्षेत्र पंढरपूर कडे दिंडी मार्गक्रमण करत असताना वेदांताचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के यांनी या घाटास “ज्ञानेश्वरी घाट” म्हणून संबोधावे असा मनोदय यावेळी व्यक्त केला.