Sunday, November 16, 2025

नागेबाबा पतसंस्था ही जनतेच्या पैशांची विश्वासाने जपवणुक करणारी संस्था-ज्ञानेश्वर महाराज तांबे

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

दि:15-7-25 नेवासा/सुखदेव फुलारी काही माणसांचा जन्म पैसे कमावण्यासाठी तर काहींचा पैशांची जपवणुक करण्यासाठी झालेला असतो. कडूभाऊ आणि नागेबाबा पतसंस्थेचा जन्म जनतेच्या पैशांची

जपवणुक करण्यासाठीच झालेला आहे. नागेबाबा पतसंस्था ही जनतेच्या पैशांची विश्वासाने जपवणुक करणारी संस्था आहे असे प्रतिपादन रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केले.

भेंडा येथील नागेबाबा पतसंस्थेच्या  कुकाणा शाखेचा शुभारंभ सोमवार दि. १४ जुलै रोजी  तांबे महाराज यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते  बोलत होते.
प्रारंभी सौ.शितलताई तांबे व ज्ञानेश्वर तांबे महाराज, सौ.शुभांगी कचरे व
सोमनाथ कचरे, पुणम पवार व गणेश पवार या उभयतांच्या  हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

यावेळी अशोकराव चौधरी, भानुदास कावरे, रामनाथ गरड,प्रा. नारायण म्हस्के, डॉ.सुभाष भागवत, सुनील गव्हाणे,दिलीप उदावंत, सोपान घोडेचोर, ललित भंडारी, विष्णूपंत पवार,दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ,अशोक वायकर,गणेश गव्हाणे, आबासाहेब काळे,संजय मनवेलिकर, अवधूत लोहकरे, नबाब शहा, डॉ.शिवाजी शिंदे, बबनराव पिसोटे, हनीफभाई शहा, मुसाभाई शेख,डॉ.गणेश आर्ले,शरद गोल्हार,डॉ.संतोष फुलारी, शरद तांबे,
अशोक दरवडे,गणेश महाराज चौधरी, सुभाष महाराज औटी,रामदास आढागळे, जालिंदर देशमुख आदि उपस्थित होते.
नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ
काळे,संस्थेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय काळे ,
प्रादेशिक अधिकारी यशवंत मिसाळ, पोपट जमदाडे, विकास अधिकारी कन्हैया काळे, शाखा व्यवस्थापक दिलदार शेख,मोहन वाघडकर, शाखा अधिकारी सुभाष उमाप आदिंनी उपस्थितांचे स्वागत केले.

नागरिकांनी जादा व्याज दराच्या अमिषाला बळी न पडता नागेबाबा पतसंस्थेत सुरक्षित गुंतवणूक करावी. अविरत सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
-कडूभाऊ काळे
अध्यक्ष,नागेबाबा पतसंस्था

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!