नेवासा
भेंडा,ता.नेवासा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २३ वे पुण्य स्मरणानिमित्त मंगळवार दि.८ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला असून सदर कार्यक्रम कारखाना गणपती स्टेज ऐवजी साईश्रद्धा मंगल कार्यालय, कुकाणा येथे होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी दिली.
यबाबद अधिक माहिती देताना श्री.शेवाळे म्हणाले की, लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २३ वे पुण्य स्मरणानिमित्त मंगळवार दि.८ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता
कारखाना गणपती स्टेज प्रांगणात
श्रीसदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख गुरूवर्य ह.भ.प.महंत उध्दवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.मात्र काल पासून सूरु असलेल्या
पावसामुळे कार्यक्रमाच्या स्थळात
बदल केलेला आहे. सदर कार्यक्रम गणपती स्टेज,भेंडा येथे न होता सदर साई श्रद्धा मंगल कार्यालय, कुकाणा येथे होईल.
ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख व संचालक मंडळाचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व सचिव रविंद्र मोटे यांनी केले आहे.