नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील वरखेड येथे लक्ष्मीदेवीच यात्रे निमिताने दि. १८ जुलै २०२५ रोजी १२ गाड्या ओढण्याचे नियोजन केले आहे.या बारा गाड्या ओढण्याचे आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाईची अशी मागणी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे केली आहे.
अनिसच्या राज्य प्रधान सचिव अड.रंजना गवांदे,राज्य समन्वयक कॉ.बाबा आरगडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदनात म्हंटले आहे की, नेवासा तालुक्यातील वरखेड येथे लक्ष्मीदेवीच देवस्थान आहे. देवस्थानची आषाढ महिण्यात १२ गाड्या यात्रा भरविली जाते. या यात्रे निमिताने लक्ष्मीआई मंदिराचे परिसरात ऊघडयावर पशुहत्या मोठ्या प्रमाणात होते. या यात्रे निमित्त लक्ष्मीदेवी ट्रस्टचे सचिव व पुजारी यांनी दि. १८ जुलै २०२५ रोजी १२ गाड्या ओढण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी १२ गाड्या ओढतांना मोठा अपघात होऊन लक्ष्मण घोडके हे मयत झाले. म्हसू घोडके, शंकर शिरसाठ (पोतराज) व इतर काही गंभिर जखमी झाले होते. पैकी शंकर शिरसाठ हे सुध्दा ऊपचारा दरम्यमान मयत आले आहे. १२ गाड्या ओढण्याच्या जिवघेणा खेळ खेळतांना १५ वर्षापुर्वी लक्ष्मण घोडके व शंकर शिरसाठ या दोघांचा बळी गेला आहे, या २ लोकांचा बळी गेल्यानंतर गावक-यांच्या विरोधामुळे सुमारे १० वर्षे ही प्रथा बंद होती. परंतू ट्रस्टचे सचिव व पुजारी यांनी आर्थिक फायदयासाठी ही प्रथा पुन्हा ४ वर्षापासुन सुरु केली आहे. गोरे हे १२ गाड्या ओढण्यासाठी मुंबई येथिल महिलेस बोलावतता. ती अंगात आल्याचे नाटक करुन गाड्या ओढण्याचे नाटक वठवतात, कारण मागच्या बाजुने इतर यात्रेकरू गाड्या ढकलत असतात. १२ गाड्या ओढण्याची ही अंधश्रध्दा / कृती गावकऱ्यांसाठी जिवघेणी ठरत आहे. या ट्रस्टच्या घटनेतही या यात्रा किंवा अशा कृतीचा उल्लेख नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात होणा-या यात्रेतही उघडयावरची पशुहत्या मोठ्या प्रमाणात होते. ट्रस्टचे कारभारात गैरव्यवहार आहे. त्याबाबत आम्ही स्वतंत्र मागणी केलेली असुन सदर ट्रस्टचे सचिव व ट्रस्ट मंडळ तसेच मुंबईकर महिलेला ट्रस्टचे सचिव व पुजारी हे अघोरी कृत्य करण्यास सहकार्य करतात त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादु टोना यांचा प्रतिबंध घालणे बाबत आणि त्याचे समुळ उचाटन करणे बाबत अधिनियम २०१३ नुसार त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात यावी, तसेच दरवर्षी या ठिकाणी अपघात होतात आणि झालेले आहेत. त्यात जीवीत हानी झालेली आहे. पुन्हा असे अपघात होऊ नये म्हणून आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी केली.
संजय वाल्हेकर, रामकिसान बनकर,अशोकराव गवांदे, विजय
शिरसाठ,अंकुश कुंडारे आदि यावेळी उपस्थित होते.