नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात आवकाली पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरांच्या आणि शेत पिकांची नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट भरपाई दया अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत केली.
नेवासा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी गुरुवार दि.१७ रोजी पावसाळी आधिवेशनात या बाबद औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
आ.लंघे म्हणाले की, माझ्या नेवासा मतदार संघात मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसाने शेती पिकांचे प्रंचड नुकसान होवून गोरगरीबांच्या घरांची सोसाट्याच्या वाऱ्याने प्रचंड दाणादान होवून पडझड झालेली आहे. तसेच अवकाळी पावसाने व वाऱ्याने कांदा,केळी,सोयाबीन आणि बाजरी या मुख्य पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा लाभ सरसकट व तात्काळ मिळावी अशी मागणी विधानसभेच्या सभापतींकडे केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची आशा पल्लवित झाली आहे.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेच्या सभापतींचे विशेष लक्ष वेधतांना ते म्हणाले की,माझा नेवासा तालुका हा ग्रामीण स्वरूपाचा भाग असून सुमारे ८० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि माहे मे आणि जून २०२५ दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून घरांची पडझड झालेली आहे असा मुद्देसुद प्रश्न सभापतींकडे उपस्थित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा सरकारच्या भूमिकेडे लागून आहेत.