भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्याटील भेंडा गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा, संत शिरोमणी सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त नागेबाबा परिवार व नागेबाबा देवस्थानचे वतीने दि.२३ जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराज सबलस (वडुलेकर) यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडुभाऊ काळे यांनी दिली.
यानिमित्त बुधवार दि.२३ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ज्ञानेश्वर महाराज सबलस यांचे किर्तने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते ६ वाजे पर्यंत सामुदायिक महाप्रसाद आणि दुपारी १ ते ४ संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच दुपारी ४ वाजता भास्करगिरी महाराज हे नागेबाबा मंदिरास भेट देऊन समाधीचे दर्शन घेणार आहेत.
नागेबाबा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नागेबाबा परिवार व भेंडा ग्रामस्थानी केले आहे.