नेवासा
नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आ.विठ्ठलराव लंघे यांचे हस्ते झाले.
त्यावेळी बोलताना आ.लंघे यांनी मी ‘हात दाखवा व गाडी थांबवा’ असा आमदार असल्याचे स्पष्ट केले.
नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर मंदिर येथे पेवहींग ब्लॉक बसवणे १० लक्ष रुपये तसेच पेहरे वस्ती ते गणपती मंदिर शाळेपर्यंत रस्ता करणे १० लक्ष रुपये असा एकूण २० लक्ष रुपये खर्चाचे कामाचा शुभारंभ शनिवार दि.२६ रोजी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते झाला.
त्यावेळी ते बोलत होते.रामभाऊ महाराज पेहरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
आ.लंघे पुढे म्हणाले की, मी नेहमी सांगतो की हात दाखवा व गाडी थांबवा असा मी आमदार असून मी तुमच्या मधलाच आहे असे आमदार आहे. माझ्या गाडीला आता सवय लागली आहे, हात दिसला की गाडी थांबते. समाजाच आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना मनात ठेवून आपल्याला पुढील काळामध्ये काम करायच आहे.
लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर जात-धर्म बाजूला ठेवून आपल्याला समाजासाठी काम करायचे असल्याची भावना नेहमी मी मनात ठेवूत मी काम करतो. स्वर्गीय वकील अण्णांच्या नंतर ४२ वर्षानंतर या तालुक्यातील मायबाप जनतेने आम्हाला व आमच्या कुटुंबीयाला आमदार पदाचा मान दिला आणि हेच नाव उज्वल ठेवण्यासाठी आपल्याला तालुक्यामध्ये भरीव असे काम करायचं असल्याचे आमदार लंघेंनी बोलताना सांगितले.
अंकुशराव काळे, ॲड.विश्वास काळे,प्रमोद गजभार,जालिंदर वाघचौरे, संजय लंघे, विवेक लंघे अशोक लंघे,शशिकांत तरमळे, सुनील वाघमारे,सचिन लंघे , मच्छिंद्र मुंगसे,हरिभाऊ कापसे ,बबन जावळे, नितीन कापसे ,गणेश कापसे, तुषार शिंदे, बाळासाहेब चावरे, किरण कापसे किशोर वाकचौरे, भाऊराव वाकचौरे , देविदास पटारे, भाऊराव जावळे , भाऊराव चौधरी, राम जावळे, संभाजी कणगरे ,राजू शिरसाठ, पांडुरंग पेहेरे ,शिवाजी जावळे, विकास चौरे,
संगीता वाळुंजकर,अलका पाठक, अश्विनी चौधरी, काजल अल्हाट, आसराबाई लोखंडे,मनीषा कुराडे,विमल जावळे ,सुनिता चौधरी,लता पाठक,स्वाती चौधरी,वैशाली चौधरी,वच्छलाबाई देऊतकर, सविता वाळुंजकर,संगीता शिंदे,लतिफा सय्यद,निर्मला पेहेरे ,शोभा चव्हाण यांचेसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.