नेवासा/सुखदेव फुलारी
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चिंचबन या गावचे शेतकरी भाऊसाहेब शिंदे व बंधू ॲड.संदीप शिंदे आणि सौ. मनीषाताई शिंदे यांनी कष्टातून उत्तम गुणवत्तेच्या केळी पिकाचे उत्पादन घेतले असून त्यांनी आपली केळी इराणला निर्यात केली आहे.
शिंदे बंधू यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम गुणवत्तेचे निर्यातक्षम दर्जेदार केळीचे पीक घेतले,नवीन जात राजनशाही, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, पाण्यासाठी आधुनिक ठिबक सिंचन पद्धत, आंतर मशागत तंत्रज्ञान व कीड आणि रोगांचा बंदोबस्त जैविक पद्धतीने केला. एकरी २५ ते ३० टन उत्पादन घेतले. त्यांनी उत्पंन्न व खर्चाचे सर्व हिशोब सांगीतले.
अप्सर भाई निर्यातदार यांच्या मदतीने केळी इराणला निर्यात केल्या . त्यांच्या बागेची पाहणी प्रगतशील शेतकरी संजय खर्डे व कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे,श्री.काकडे यांनी कौतुक केले .
एकरी ९० हजार ते १ लाख उत्पादन खर्च तर उत्पादन ५.५० ते ६ लाख मिळाले यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घ्यावा.
———–
शिंदे परिवाराने स्थानिक बाजारापेक्षा निश्चीत जास्त लाभ मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असून भविष्यात शेतमालाची निर्यात हा शेतीमध्ये नफा मिळवणारा हुकमी उपाय आहे.
-डॉ.अशोकराव ढगे(कृषी शास्त्रज्ञ)