मुंबई
राज्यात पूर्ण झालेल्या पाटबंधारे प्रकल्पांच्या पारंपारिक उघड्या प्रवाही पध्दतीच्या कालवा वितरण प्रणालीचे रुपांतरण बंद नलिका वितरण प्रणालीमध्ये करण्याचे धोरण निश्चित करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने यबाबद दि.१ ऑगस्ट रोज़िन शासन निर्णय जारी केला आहे. त्यात म्हंटले आहे की, सिंचन प्रकल्पात नलिकेद्वारे पाण्याचे वितरणाबाबत शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले असून शासन परिपत्रकान्वये नलिकेद्वारे वितरण प्रणाली धोरणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच नलिकेद्वारे वितरण प्रणालीकरिताची हस्तपुस्तिका देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. या संदर्भ परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
नलिके वितरण प्रणालीच्या धोरणानुसार नलिका वितरण तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत असल्यास नलिका वितरण प्रणाली राबविता येते. हे धोरण बांधकामाधीन प्रकल्पांसाठी लागू आहे. कालवा प्रणालीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अस्तित्वातील उघड्या प्रवाही कालवा प्रणालीऐवजी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करण्याबाबत निश्चित असे धोरण नाही. जलसंपदा विभागाकडील पाटबंधारे प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात पांरपारिक उघड्या प्रवाही पध्दतीची कालवा प्रणाली अस्तित्वात असून पाणी झिरपणे, बाष्पीभवन इत्यादी कारणास्तव सिंचन प्रभावी होत आहे. विविध लोकप्रतिनीधी तसेच पाटबंधारे महामंडळांकडून याअनुषंगाने अस्तित्वातील उघड्या प्रवाही कालवा प्रणालीचे रुपांतर बंद नलिका वितरण प्रणाली करण्याच्या मागण्या/प्रस्ताव प्राप्त होत आहेत.
वरील पार्श्वभूमी विचारात घेता पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या अस्तित्वातील पारंपारिक उघड्या प्रवाही पध्दतीचा कालवा वितरण प्रणालीचे रुपांतरण बंद नलिका वितरण प्रणालीमध्ये करण्याचे धोरण निश्चित करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
पूर्ण झालेल्या पाटबंधारे प्रकल्पांच्या अस्तित्वातील पारंपारिक उघड्या प्रवाही पध्दतीच्या कालवा प्रणालीचे रुपांतरण बंद नलिका वितरण प्रणालीमध्ये करण्याचे धोरण निश्चित करण्यासाठी पुढील प्रमाणे अभ्यास समिती गठीत करण्यात येत आहे.
ती अशी…
*अध्यक्ष:- कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
*सदस्य:- १)कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे २) मुख्य अभियंता (जसं), गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर
३) मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर,४) अधीक्षक अभियंता, कालवे संकल्पचित्र मंडळ, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक,
*सदस्य सचिव:- अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
*समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:–१) पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाच्या पारंपारिक उघड्या प्रवाही पध्दतीच्या कालवा प्रणालीचे रुपांतरण बंद नलिका प्रणालीमध्ये करण्यासाठी सर्वकष निकष निश्चित करणे.
२) बंद नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरण केल्याने उघड्या प्रवाही पध्दतीच्या कालव्यांच्या उपलब्ध होणाऱ्या जमिनीच्या वापराबाबतची मार्गदर्शक तत्वे ठरविणे.
३) उपरोक्त दोन मुद्दे विचारात घेऊन धोरणाचा प्रारुप मसुदा सादर करणे.
*समितीचा कालावधी:– सदर समितीने शासन निर्णय प्रसिध्दीच्या दिनांकापासून ३ महिन्यात अहवाल शासनास सादर करावा.