Wednesday, February 11, 2026

नेवासा पोलिसांची कामगिरी;चोरीस गेलेले टाळ भजनी मंडळाकडे सुपुर्द

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा बतालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे चोरिस गेलेले २२ हजार ४०० रुपये किमतीचे २८ पितळी टाळ नेवासा पोलिसांनी भजनी मंडळाकडे सुपुर्द केले.

याबाबात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे चोरिस गेलेले २२ हजार ४०० रुपये किमतीचे २८ पितळी टाळ चोरीला गेल्याचे दिसुन आल्यानंतर पोलीस ठाणे नेवासा येथे अशोक बाबासाहेब चौधरी (वय ६० वर्ष) रा. रांजणगाव देवी ता. नेवासा यांनी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीला अनुसरून पोलीस ठाणे नेवासा येथे अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करून तपास पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला होता.
चोरीचा गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस निरीक्षक पोलीस धनंजय जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. आली या तपासा करिता नेवासा पोलीस ठाणेचे डी.बी. पथक कामास जुंपले होते. तपासा दरम्यान पोलिसांनी मंदिराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक ऑटोरिक्षा संशयास्पद फिरताना दिसून आली होती. पोलिसांनी हाच धागा पकडून सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयास्पद रिक्षाचा माग काढीत शेवगाव पर्यंत गेले होते. शेवगावमध्ये गेल्यानंतर सदरची रिक्षा राजू भगवान नागरे रा. दादेगाव रोड, शेवगाव यांच्या मालकीची असून राजू नागरे व संगीता सूर्यकांत सर्जेराव रा. कापकर वस्ती, शेवगाव या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केल्यानंतर प्रथमतः आम्ही असे काही केलेच नाही असे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवून पुन्हा बारकाईने विचारपूस केली असता रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर मंदिरातून पितळी टाळ चोरल्याचे कबूल केले.
या चोरी प्रकरणी राजू भगवान नागरे व संगीता सूर्यकांत सर्जेराव यांना अटक करून २२ हजार ४०० रुपये किमतीचे २८ पितळी टाळ व ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केली होती.
चोरीस गेले टाळ पोलिसांनी मंगळवारी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर विधीवत परत केले.यावेळी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष अशोक चौधरी, अशोक रोडगे, नानासाहेब चौधरी व सारंगधर वाकचौरे इत्यादी हजर होते.भजनी मंडळाने आनंद व्यक्त केला आहे.
सदरचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, गणेश जाधव व अमोल साळवे यांनी केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!