नाशिक/प्रतिनिधी
सन २०२४-२५ या वर्षाकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धेसाठी
ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,नाशिक तथा अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा राजेश गोवर्धने यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे वतीने महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा सन २०२४-२५ करीता अभियान राबविणे बाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. राजातील सर्व कार्यान्वित पाणी वापर सहकारी संस्था, पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धेत सक्रीय सहभाग घ्यावा असे सूचित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक पाणी वापर संस्थांनी दि.३१ ऑगस्ट २०२५ पूर्वी ऑनलाईन नामांकने (प्रस्ताव) दाखल करावीत.
*पुरस्काराचे स्वरूप:–* राज्यस्तरीय दोन्ही गटांमध्ये प्रथम व व्दितीय असे ४ व पाच महामंडळस्तरावर दोन्ही गटांमध्ये प्रथम व व्दितीय असे २० याप्रमाणे एकूण २४ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कार प्रत्येक गटांमध्ये प्रथम क्रमांक रुपये ५ लक्ष व प्रशस्तीपत्र,व्दितीय क्रमांक रुपये ३ लक्ष व प्रशस्तीपत्र तर महामंडळस्तरीय पुरस्कार प्रत्येक गटांमध्ये प्रत्येक गटांमध्ये प्रथम क्रमांक रुपये २ लक्ष व प्रशस्तीपत्र,व्दितीय क्रमांक रुपये १ लक्ष व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जलसंपदा विभागांतर्गत पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक, मालेगांव पाटबंधारे विभाग, मालेगांव, मुळा पाटबंधारे विभाग,अहिल्यानगर व अहिल्यानगर पाटबंधारे विभाग,अहिल्यानगर या विभागांतर्गत असलेल्या कार्यान्वित पाणी वापर संस्था यांच्याकडून सन
२०२४-२५ चे महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने नामांकने सादर करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
जलसंपदा विभागाचा शासन निर्णय सीडीए २०२३/(२२३/२३) लाक्षेवि (कामे), मंत्रालय, मुंबई दि.२४ एप्रिल २०२५ नुसार वरील पुरस्काराकरिता जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पावरील कार्यान्वित पाणी वापर संस्थांकडून ऑनलाईन पद्धतीने नामांकने मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्या करिता लिंक महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर https://wrd.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात आली असून तरी दि.३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाणी वापर संस्थांना नामांकन दाखल करावीत. कोणतीही कागदपत्रे कार्यालयाकडे जमा करण्यात येऊ नयेत.अधिक माहितीसाठी उपरोक्त शासन निर्णय देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नामांकने सादर करण्यासाठी प्रकल्पाशी संबंधीत मंडळ कार्यालया मधील स्थापित मंडळस्तरीय कृती समिती तथा शासन निर्णय क्र. सीडीए २०२४/(९३/२०२४) लाक्षेवि (कामे), मंत्रालय, मुंबई दि.११ ऑक्टोबर २०२४ चे पाणी वापर संस्था सनियंत्रण मुल्यमापन कक्ष यांचे सहाय्य घेण्यात यावे. सदर स्पर्धेकरिता आवेदन पत्र सादर करतांना पाणी वापर संस्थांची जुलै २०२३ ते जून २०२४ व जुलै २०२४ ते जून २०२५ मधील केलेल्या कामाची मुद्देनिहाय माहिती भरणे अपेक्षित आहे.
*गठीत करण्यात आलेली मंडळस्तरीय कृती समिती अशी…
पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनानुसार प्राप्त झालेल्या पाणी वापर संस्थांच्या आवेदनांची छाननी व मुल्यांकन कार्यवाहीकरिता
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी
मंडळस्तरीय कृती समिती गठीत केली आहे,ती अशी…
*अध्यक्ष:– श्री.राजेश बा. गोवर्धने
(अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,नाशिक)
*सदस्य:– श्री. वैभव शां. भागवत
(कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक),
श्री. मनोज ढोकचौळे(कार्यकारी अभियंता, नांदुर मधमेश्वर प्रकल्प
विभाग, नाशिक),श्री. लक्ष्मीकांत शंकर वाघवकर व श्री.सुखदेव एकनाथ फुलारी (अशासकीय संस्थेचे निमंत्रित प्रतिनिधी),श्री.रितेश जाधव (सहायक अभियंता श्रेणी-१, कुर्णाली उपविभाग, नाशिक), श्री.शहाजी सोमवंशी
(पाणी वापर संस्था प्रतिनिधी).
*सदस्य सचिव:–श्री.निलेश सं. वन्नेरे
(सहायक अभियंता श्रेणी-१ वाघाड कालवा उपविभाग क्र.१ दिंडोरी)