नेवासा/प्रतिनिधी
अप्पर जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालक श्रीमती सुचिता भिकाने यांचा जन्मदिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने या मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. यांनी सामाजिक बांधिलकी जपत आत्ता पर्यत अनेक उपक्रम राबविलेले आहेत. मुक्या प्राण्यांचे संगोपन,अपघाती प्राण्यांना रुग्ण वाहिका उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार करून सांभाळ करण्यासाठी त्यांची “शिवपूजा अॅनिमल केअर हाऊस,पुणे” ही संस्था सन २०२२ पासून अविरत सेवेत आहे.शिवपूजा फौंडेशन मार्फत मुक्या प्राण्यासाठी निवारा स्थानाची देखील सोय करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील २२० केव्ही वीज उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंतनु सूर्यकर यांनी दि.१२ ऑगस्ट रोजी श्रीमती सुचिता भिकाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक पेड मा के नाम’ या संकल्पनेनुसार नेवासा तालुक्यातील फत्तेपुर येथील शरणपूर वृद्धाश्रमात वृक्षारोपण करून आश्रमातील वृद्ध व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाघ व रावसाहेब मगर यावेळी उपस्थित होते.
म्हाळस पिंपळगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच खडका फाटा येथील आनंद गोशाळेतील ७० देशी गायींना चाऱ्याचे वाटप करण्यात आले.