नेवासा/प्रतिनिधी
रस्ता देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन देवून ही रस्ता खुला न केल्यामुळे संतोष भाऊराव टांगळ या शेतकऱ्याने देडगांव कामगार तलाठी कार्यालयासमोर अमरण उपोषण सूरु केले आहे.
नेवासा तालुक्यातील देडगांव येथील एका शेतकऱ्याने जाणे-येणेसाठी तसेच शेतीची मशागत करण्यासाठी रस्ता मिळण्याकामी नेवासा तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज सादर करुन रस्ता मिळण्याच्या मागणीसाठी गावातील कामगार तलाठी कार्यालयासमोर संतोष भाऊराव टांगळ या शेतकऱ्यांने एक महिन्यापुर्वी उपोषण केलेले होते. नेवासा तहसिलदार कार्यालयाकडून या शेतकऱ्याला रस्ता देण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्यास भाग पाडलेले होते. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा या शेतकऱ्याने देडगांव येथील कामगार तलाठी कार्यालयासमोर मंगळवार दि.१९ ऑगस्ट पासून अमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस उलटूनही या शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाने अद्याप दुर्लक्ष केल्यामुळे आपण आता माघार घेणारच नसून माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर ठेवून रस्त्याची मागणी मान्य करुन रस्ता खुला होत नाही? तो पर्यंत अमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते शेतकरी संतोष टांगळ यांनी दिला.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,मौजे देडगांव (ता.नेवासा) येथील शेत जमीन गट नंबर – ५८४ /१ (अ) तसेच गट नं.५८३/१ मध्ये जाणे – येणे वहीवाट आणि शेतीची महेनत मशागत करण्यासाठी रस्ता मिळण्याबाबत संतोष भाऊराव टांगळ (वय ३८ वर्षे) रा.देडगांव,ता.नेवासा जि.अहिल्यानगर या शेतकऱ्याने जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम (१४३) नुसार मौजे देवगांव ता.नेवासा येथील नायब तहसीलदार नेवासा यांच्याकडे रस्ता मिळण्याकामी अर्ज केलेला होता व रस्ता मिळण्यासाठी आमरण उपोषणही केलेले होते त्यामुळे शासनाच्यावतीने नायब तहसीलदार, मंडलाधिकारी आणि कामगार तलाठी यांनी पहील्यांदा केलेल्या उपोषणात या शेतकऱ्याला रस्ता देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलेले होते माञ आता महीना उलटून जावूनही अद्याप या शेतकऱ्याला रस्ता खुला करुन न दिल्यामुळे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकांची मोठी नुकसान होत असल्यामुळे दोन दिवसांपासून देडगांव येथे या शेतकऱ्याने रस्ता मिळण्याकामी कामगार तलाठी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे या शेतकऱ्याच्या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची मागणी सामाजिक संघटनेने केली आहे.