राहुल कोळसे:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे महादन कृषी कंपनी मार्फत कापूस पीक पाहणी व चर्चासत्र तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी गुहा येथे पार पडले.यावेळी महाधनच्या वतीने सिद्धेश कदम (मार्केटिंग मॅनेजर) प्रियाल गागरे (मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गुहा येथील रेणुका कृषी सेवा केंद्राचे डायरेक्टर अविनाश कोळसे , रविंद्र कोळसे यांच्या वतीने या शिबिरासाठी सहकार्य लाभले. महाधनच्या वतीने कदम यांनी शेतकऱ्यांना कपशी, कांदा, मका तसेच अन्य पिकांना क्रॉपटेक 8:21:21 या खताविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गुहा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.