नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई येथील जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा उत्कृष्ट पत्रकारिता समाजसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी दिली.
विनायक दरंदले यांना अनेक वेगवेगळ्या संघटनेकडुन पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार ॲड राहुल ढिकले, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, माजी खासदार व सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर सावंत, पोलीस तक्रार निवारणणेचे डीवायएसपी शिरिष जाधव हे उपस्थित राहणार आहे.