राहुल कोळसे:राहुरी तालुक्यात गुहा गावात काल शुक्रवारी 22 ऑगस्ट बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यांत्रिकी युगामुळे काही बैलांची संख्या कमी झाल्याने मारूती मंदिरासमोर उपस्थित होते. वर्षभर शेतात राबवून बळीराजाला शेत जमिनीतून धान्याचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांची उतराई होण्याकरिता बैलपोळा हा सण गुहा गावात घरोघरी शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
परंतु बैलजोडी सांभाळण्यासाठी स्वतंत्र एक मनुष्याची गरज भासत असल्याने आणि बैलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी सरकी पेंड तसेच चारा मोठ्या प्रमाणात लागतो. सध्याच्या महागाईच्या युगात बळीराजाला या गोष्टी परवडत नसल्यामुळे आणि सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेची बचत होण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकी युगाला प्राधान्य दिले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच आपल्याकडे असलेले पशुधन गाय, शेळी आणि काही प्रमाणात असलेल्या बैलांना अंघोळ घालून वेगवेगळ्या रंगीबिरंगी कलरने सजवून सायंकाळी मारुती मंदिरासमोर आणले व मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला
.