नेवासा
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सन २०२५ चे गणेशोउत्सवा करिता परवानगी घेणेसाठी महाराष्ट्र पोलिस नागरिक सेवा पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करतांना https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx
या लिंकचा वापरून आपले जवळील ई-सेवा केंद्र किंवा सायबर कॅफे मध्ये अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रत व संबधीत सर्व कागदपत्रे नेवासा पोलीस स्टेशन गोपनीय विभाग येथे जमा करावी असे आवाहन ही श्री.पाटील यांनी केले आहे.