नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचा वर्ष २०२४-२५ चा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार शनिवार दि. २३ ऑगस्ट २५ रोजी प्रदान करण्यात आला.
न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहिल्यानगर येथे विद्यापीठ क्रीडा मंडळ व शारीरिक शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संचालक डॉ. सुदाम शेळके, सिनेट सदस्य डॉ. रमेश गायकवाड, प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे,शारीरिक शिक्षण संचालक डॉ.दत्ता वाकचौरे, रघुनाथ मोरकर यांनी स्वीकारला.
१२०० ते २००० या विद्यार्थी संख्येच्या महाविद्यालय गटात सातत्याने उत्कृष्ट क्रीडा कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाला हा पुरस्कार देण्यात येतो.
यबाबद माहिती देताना प्राचार्य डॉ. लांडगे म्हणाले की, श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेने महाविद्यालयात क्रीडा संकुल उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे मागील तीन वर्षात महाविद्यालयाचे सात खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये खेळले आहेत. यावर्षी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची प्रो कबड्डीसाठी निवड झाली आहे.
यापूर्वीही महाविद्यालयाच्या शंकर गदई यास महाराष्ट्र शासनाचा कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल२०२४-२५ या वर्षाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरुष संघाचे शिबिर महाविद्यालयाने आयोजित केले होते. या ठिकाणी महाराष्ट्र संघाची निवड झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र संघामध्ये शंकर गदई आणि राहुल खाटिक यांची निवड झाली होती. महाविद्यालयाने खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनही केले होते.
महाविद्यालयाला उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, ऍड. देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील,सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे, तसेच सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले आहे.