Sunday, March 29, 2026

नेवासा तालुक्यातील दुसरी घटना;कर्जबाजारीपणाला कंटाळून गोयगव्हाण येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील नानासाहेब केशव ठोंबळ (वय ४९ वर्षे) या शेतकऱ्याने दि.२१ रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकाच आठवड्यात शेतकरी आत्महत्येची नेवासा तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

यबाबद अधिक माहिती अशी की,
नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील नानासाहेब केशव ठोंबळ (४९ वर्षे) या शेतकऱ्याने वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खत आणि औषधे घ्यायला पैसे नसल्यामुळे या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत
विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

शेतकरी आत्महत्येमुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसात शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.
१७ ऑगस्ट रोजी वडूले येथील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने विष घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर नानासाहेब ठोंबळ या शेतकऱ्याने जीवन संपवले. कै. नानासाहेब ठोंबळ यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे.

ठोंबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी वर्गणी काढून पैसे काढत अंत्यसंस्कार केल्याचे प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांनी सांगितले. या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेले बळी असल्याचा आरोप प्रहारने केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!