Wednesday, December 17, 2025

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांक 

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

राहुल कोळसे:अहिल्यानगर जिल्हा क्रीडा व युवा संचालनालय मार्फत घेण्यात आलेल्या राहुरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारवाडी तालुका राहुरी येथे करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील सुमारे 24 संघ 14 वर्षे वयोगटातील होते, तर 17 वर्षे वयोगटातील वीस संघ यांनी स्पर्धेत सहभागी झाले होते. या सर्व 24 संघाना मात देत आपल्या ज्ञानवर्धिनी शाळेच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने आदर्श विद्यालय, ब्राह्मणी या विद्यालयाबरोबर अंतिम सामना झाला. त्यामध्ये ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय संघासाठी निवड झाली आहे.

राहुरी तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली. यामध्ये तन्वी कोळसे, प्रांजल मुसमाडे, पियुषा शेलार, स्नेहल साबळे, श्रावणी वरघुडे, समृद्धी शेलार, गौरी शेलार या मुलींनी आपल्या खेळाची दरवर्षीप्रमाणे खेळाची विशेष शैली दाखवत संघाला अंतिम सामन्यात गाठण्याची संधी दिली व विजय खेचून आणला. यामध्ये संघाचे नेतृत्व प्रांजल मुसमाडे हिने केले.तसेच14 वर्षे वयोगटाच्या संघाने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष खेळाडू म्हणून श्रद्धा मुसमाडे, आदिती मुसमाडे, अनुष्का कोळसे, स्वराली पारखे, तेजश्री डोंगरे, आराध्या कोळसे, धनश्री मुसमाडे, धनश्री मते, धनश्री शेळके, तेजल भिंगारदे, साक्षी अवताडे यांनी समोरच्या संघावर मात करत अंतिम सामन्यात पर्यंत मजल मारली. यामध्ये संघाचे नेतृत्व आदिती मुसमाडे हिने केले. यामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळून शाळेचे व संघाचे नाव रोशन केले.

सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक माननीय सौरभ वरखडे सर यांचे विशेष व मेहनतीचे मार्गदर्शन मिळाले आहे. विशेष मार्गदर्शन शाळेचे कोऑर्डिनेटर्स अमोल तोडमल व माजी मुख्याध्यापक वसंतराव जाधव मुलांना विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व पालक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती, सर्व स्टाफ च्या वतीने अभिनंदन होत आहे. शाळेचे संस्थापक ज्ञानदेव शेलार ,सेक्रेटरी मनीषा शेलार ,उपाध्यक्ष संभाजी हराळ, संचालक मेजर चंद्रकांत सौदागर, विक्रम जाधव या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचार्य औदुंबर कडू ,उपप्राचार्य अरुण पारखे ,कोऑर्डिनेटर अमोल तोडमल, अर्जुन मुसमाडे, सुनील मुसमाडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!