Friday, May 15, 2026

राज्यस्तरीय बॉलबॅटमिंटन स्पर्धेसाठी गुहा येथील ज्ञानवर्धिनी सेंट्रलच्या खेळाडूची निवड

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

राहुल कोळसे:17 ते 19सप्टेंबर 2025 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय बॉलबॅटमिंटन स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा आज संघ निवड चाचणी झाली. त्या निवड चाचणी मध्ये राहुरी तालुक्यातील गुहा येथील ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता .यात अहिल्यानगर संघाची निवड झाली यामध्ये. या मुलींच्या अहिल्यानगर संघामध्ये निवड झाली व अहिल्यांनगर संघाच्या कर्णधारपदी समृद्धी ज्ञानदेव शेलार हिची निवड झाली.

 मुलींच्या संघामध्ये

1) समृद्धी ज्ञानेदेव शेलार

2)ईश्वरी अशोक गागरे

3) शरयू शामराव सौदागर

4) गौरी नानासाहेब शेलार

मुलांचा संघात

1) साई विजय कोळसे

2)अंश शरद ठोंबरे

या विद्यार्थ्यांची निवड झाली. यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार व सेक्रेटरी , मनीषा शेलार, माजी मुख्याध्यापक वसंतराव जाधव, तसेच उपाध्यक्ष प्राध्यापक संभाजी हराळ, प्राचार्य औदुंबर कडू, उपप्राचार्य अरुण पारखे, कोऑर्डिनेटर अमोल तोडमल, क्रीडाशिक्षक सौरभ वरखडे, अर्जुन मुसमाडे,शिक्षिका शितल जाधव, गीतांजली गावडे, सुजाता कोळसे, राजश्री गाडे, जयश्री पागिरे यांनी अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!