Sunday, October 26, 2025

कान्हूर पठार येथे विद्यार्थ्यांसाठी अंनिस कडून हातचलाखी व वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

महाराष्ट्र आंदोलन समिती अहिल्या नगर जिल्हा शाखेच्या वतीने पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील जनता विद्या मंदिर व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हातचलाखी व वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले.

सोमवार दि.१५ सप्टेंबर सकाळी ११ जनता विद्या मंदिर व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कान्हूर पठार येथे अंनिसचे जिल्हा अध्यक्ष सेवानिवृत्त एसीपी बाबासाहेब बुधवंत यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम झालेल्या या कार्यक्रमाचे वेळी जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा व कॉ.देवदत्त साळवे, मेजर सुभाष पाटील ठुबे,मेजर संतोष ठुबे,अजित साळवे, साहेबराव गायकवाड, मुख्याध्यापक नितीन काळे व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा व कैलास लोंढे यांनी वैज्ञानिक प्रयोग सादर केले.

जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांनी
विद्यार्थिनींसाठी ‘चला निर्भय होऊया’ या अनुषंगाने मुलींशी हितगुज करून मार्गदर्शन केले. मोबाईल वापराचे फायदे व तोटे याचे सविस्तर विश्लेषण केले. त्याचबरोबर यूपीएससी, एमपीएससी परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करून काही अडचण अथवा शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी हजर होते. विद्यालयातील सर्व प्राध्यापिकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सहकार्य केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!