नेवासा
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील पत्रकार युनूस पठाण यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र आयोजित आयडॉल ऑफ महाराष्ट्र २०२५ चा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिले गेले . त्यामध्ये नेवासा तालुक्यातील बालाजी देडगावचे पत्रकार युनूस शरीफ पठाण यांना
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, भूमाता महिला ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक तृप्तीताई देसाई , द युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार भाई शेख या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेवानिवृत्त सुभेदार श्रीपती देशमाने, संस्थेच्या महिला राज्य अध्यक्ष रुपाली सावंत ,महिला राज्यसचिव मंगल सासवडे, राज्य संपर्कप्रमुख इम्रान शेख,पुणे जिल्हाध्यक्ष शकील मणियार, शहराध्यक्ष अनिल गवळी, जिल्हा खजिनदार इसरार शेख, काशिनाथ आल्हाट आदी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे यांनी प्रास्ताविक केले.शकील मनियार यांनी आभार मानले.
युनूस पठाण यांना आज पर्यंत विविध संस्थेचे पुरस्कार मिळालेले असून पत्रकारितेतून समाजसेवा करण्याचे काम करत असतात. त्याच उद्देशाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .याबद्दल नेवासा तालुक्यातून त्यांचे कौतुक अभिनंदन होत आहे.




