गुहा वार्ताहर: राहुरी तालुक्यातील गुहा येथील बिरोबा मंदिर रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या संदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गटविकास अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की गुहा गावातील बिरोबा मंदिर रस्ता अंदाज पत्रकाप्रमाणे झाले नसून सदर रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले असून दोन महिन्यांत जागोजागी खचला असून सदरची रस्त्याची दूर अवस्था झालेले दिसून येत आहे.
तरी सदरचा रस्ता दुरुस्ती करून ठेकेदारावर करावाई करण्यात यावी व बील आदा करु नये.तरी यावर योग्य कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.




