नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील निंभारी, अंमळनेर ,करजगांव, वाटापूर, तामसवाडी, पानेगांव,शिरेगांव ,खेडलेपरमानंद, लांडेवाडी, गणेशवाडीसह सोनई परीसरात गुरुवार दि.१७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री विजेचा कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस पाऊस झाला. सलग सहा दिवसांपासून होत असलेल्या पाऊसाने आणखी भर पडली शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं.नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांचेसह पाहणी केली.
शिरेगांव, राजळे वस्ती, खेडलेपरमानंद येथे ही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शिरेगांव माजी सरपंच किरण जाधव यांनी आमदार लंघे यांना सांगितले. शेतामध्ये असणारे सोयाबीन,बाजरी, कपाशी,ऊस, मका,घास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथे असणाऱ्या ओढा कडेचा जमिनी हि वाहून गेल्या असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून सोनई कडे जाणारे रस्ते बंद झाले. करजगांव, गणेशवाडी, पानेगांव सोनई खेडलेपरमानंद शिरेगांव ओढ्याच्या पुलावरून प्रचंड पाणी वाहत असल्याने विद्यार्थी, कर्मचाऱ्यारी , दुकानदार, दूध उत्पादन शेतकरी यांना मोठी कसरत करावी लागली. तसेच काहिंना घरी थांबावे लागले. त्यामुळे दूध उत्पादक मोठे नुकसान झाले. पाहणी दौऱ्यात परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
*आमदार विठ्ठलराव लंघे …
मुळाथडी परीसरात गुरुवारी मध्यरात्री ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आज च्या पाहणी दौऱ्यात तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.
*तहसीलदार डॉ.संजय बिरादार…
मुळाथडी परीसरात झालेली ढगफुटीने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाला सरसकटपणे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




