Wednesday, December 17, 2025

रेडिओ बिग एफएम च्या वतीने तक्षशिलाच्या विठ्ठल कदम आणि संदीप खाटीक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

 

अहिल्यानगर: रेडिओ बिग एफएम, अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्राचार्य आणि शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य संदीप खाटीक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर के बाला राजू करी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. निमसे यांनी, तक्षशिलाच्या शिक्षकांनी उत्कृष्ट शिक्षक आणि अति उत्कृष्ट शिक्षक म्हणून आपला विकास साधला आहे, म्हणूनच त्यांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे,” असे सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. या सोहळ्याला पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ विजय कदम व संचालिका शुभांगी कदम यांनी प्राचार्य विठ्ठल कदम व उपप्राचार्य संदीप खाटीक यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!