माय महाराष्ट्र न्यूज:शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे नवरात्र उत्सव निमित्ताने मोहोटादेवी येथून सोमवारी पायी ज्योत आणण्यात येणार आहे या पायी ज्योत घेऊन येण्यासाठी युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दरवर्षी मोहटादेवी याठिकाणाहुन हे युवक पायी ज्योत घेऊन येतात. येथील खंडोबा मंदिर आखाडा परिसरातील युवक नेहमी धार्मिक कार्यक्रम मध्ये अग्रभागी असतात. याचबरोबर सामाजिक क्षेत्रात नेहमी मदत केली जाते.
नवरात्र उत्सवात याठिकाणी मोठ्या उत्साहात नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यामध्ये परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सातव्या दिवस फराळाचा कार्यक्रम होतो आणि शेवटच्या दिवशी टाळ मुरंदुगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.या नवरात्र उत्सव मध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




