माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहरातील खराडी भागातील परमार स्केअर हौसींग सोसायटी खराडी येथील भर पावसाळ्यात पाणीपुरवठा अधिकारी यांनी कुठली ही सूचना सोसायटीला न देता पाणी पुरवठा बंद केला . आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले सोसायटी मधील लोकांना पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे .बंड गार्डन पाणीपुरवठा अधिकारी नितीन जाधव यांना निलंबित करा व सोसायटीला लवकरात लवकर पाणी द्या अन्यथा 8 दिवसात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करू या मध्ये मनपा प्रशासन यांनी लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा असे सोसायटी चे अध्यक्ष दिगंबर बंडु तात्या पठारे यांनी बोलतांना सांगितले .
तसेच सोसायटी मधील प्रमुख सदस्य या वेळी उपस्थित होते सोसायटीचे अध्यक्ष बंडू तात्या पठारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कामगार विभाग चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महेश भाऊ गवई, संतोष वाळुंज, मंगेश पाटील, उल्हास अस्वार, प्रमोद सिंग,सत्यम गांधी, राकेश सुद, सुभाष घाडघे,सामाराम चौधरी, मनीषा पठारे,वाळके मावशी,सौ. माने, ऐश्वर्या गवई,ॲडव्होकेट विशाल केदारी,दादा रणसिंग,डाॅ. आम्रपाली मोहिते यावेळी उपस्थित होते.




