माय महाराष्ट्र न्यूज:विधी सेवा समिती नेवासा व नेवासा तालुका वकील संघ यांच्या विद्यमाने कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश नेवासा श्री आर आर हस्तेकर होते. यावेळी बोलताना श्री हस्तेकर म्हणाले “विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून जागृत नागरिक व्हावे. ज्या देशात नागरिक जागृत असतात तेथे कायद्याचे पालन चांगल्या प्रकारे होते. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सरकारकडून विविध सेवा दिल्या जातात या सेवांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे” यावेळी नेवासा तालुका वकील संघाचेअध्यक्ष अँड.अजय रिंधे , अँड.ए. वाय. पालवे, अँड.पी.सी.नाहार, अँड.गोकुळ भाताने यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे विविध पैलू आपल्या भाषणातून उलगडून दाखवले.
यावेळी तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी न्यायाधीश महोदयांची मुक्त मुलाखत घेतली. आपण यायाधीश व्हावे असे आपल्याला का वाटले?यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? कायदा आणि नियम यात काय फरक असतो? आपल्या देशात मुलांना कोणते कायदेशीर हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत? सायबर गुन्हे खूप वाढले आहेत. यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? समाजातल्या गरीब लोकांना न्याय मिळावा यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे? विद्यार्थी म्हणून आम्ही आमच्या देशासाठी आणि समाजासाठी काय मदत करू शकतो? असे विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी कुतूहल व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आर आर हसतेकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांजली दळवी यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ विजय कदम यांनी केले तर प्राचार्य विठ्ठल कदम यांनी आभार मानले.या कार्यक्रमाकरिता संचालिका शुभांगी कदम, पत्रकार इनुस भाई पठाण, पत्रकार विष्णू मुंगसे व पत्रकार बन्सी भाऊ एडके उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच पक्षकार, नागरिक व विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संदीप खाटीक उपप्राचार्य मयुरी पवार ,समन्वयक जॉन दळवी ,समन्वयक कल्पना पवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.




