राहुल कोळसे: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, आंबी, गुहा, चिंचोली, पिंपळगाव फुणगी, गणेगाव, ताहाराबाद तसेच संपूर्ण तालुक्यात शनिवारी उशिरा रात्री ते रविवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला आहे .त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतात पाणीच पाणी साचलेले बघायला मिळत आहे .

राहुरी तालुक्यातील गुहा येथे शनिवारी रात्रभर जोरदार पाऊस कोसळला आहे गावातील सर्वच ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. मुख्य रस्ते हे पाण्याखाली गेले आहे काही ठिकाणी व्हेरी ही कोसळल्या आहे. कपाशी, कांदा, मका, चारा पिके तसेच अन्य पिके हे पाण्याखाली गेली आहे. वाड्या – वस्तीवर जाणारे रस्ते हे ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुहा येथील बाळासाहेब रामकृष्ण कोळसे यांच्या शेतातील विहीर कोसळली आहे.राहुरी तालुक्यातील देवळाली – श्रीरामपूर हा मुख्य रस्ता तसेच गुहा – देवळाली ,गुहा- नांदूर , गुहा -कनगर रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे दोन्हीकडची वाहतुकी बंद करण्यात आली आहे.

राहुरी तालुक्यातील देवळाली मंडलात 60 मिलिमीटर च्या पुढे पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.निंभरे शिवारात निळवंडे कॅनॉल फुटला मात्र कुठलीही हानी नाही. टाकळीमिया येथील नागवडा वस्ती येथे चारही बाजूने पाणी आल्याने 32 नागरिकांना हलवण्यात आले आहे.शिलेगाव- उंबेरे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे.तालुक्यातील मुळानदीवरील कोंढवड, केदंळ व देवनदी वरील देसवंडी, सडे आदी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

[ गुहा गावात महसूल अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे
काल 27 सप्टेंबर रोजी दिवसभर उघडी दिल्यामुळे गुहा गावातील शेतीचे जे नुकसान झाले आहे त्याची पंचनामे ग्राम महसूल अधिकारी संभाजी थोरात, सहाय्यक कृषी अधिकारी प्रतीक ठाकरे, ग्रामपंचायत अधिकारी पटेकर,महसूल सेवक प्रमोद ओहोळ, ग्रामपंचायत कर्मचारी रंगनाथ ओहोळ यांनी पंचनामे केले. गुहा परिसरात पंचनामे सुरू असताना माजी मंत्री प्राजक तनपुरे यांनी भेट दिली व पंचनामे विषयी माहिती घेतली.]




