राहुल कोळसे:हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपली एकत्रित कुटुंब पद्धती किती गरजेचे आहे . यासाठी सर्वांनी मिळून मिसळून राहावे आणि कुटुंब एकोप्याने राहावं यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसाद बानकर यांनी व्यक्त केले.
26 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सव निमित्त गुहा येथील शिवनेरी तरुण मित्र मंडळाने कुटुंब प्रबोधन हा कार्यक्रम आयोजित केला.कार्यक्रमाचे प्रमुख बनकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की ही म्हणाले की विदेशी संस्कृतीने आपल्या हिंदू संस्कृतीचा ऱ्हास कसा केला आहे. सोशल मीडियाचे होणारे दुष्परिणाम व मोबाईल मुळे झालेले समाजावर विघातक परिणाम हे देखील समजावले.
या कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांनी भेट दिली मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.




