अहिल्यानगर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे ७०० वर्षा पूर्वी नेवासा येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, महिम भट, चक्रधर स्वामी यांनीही मराठी भाषेचा प्रचार प्रसाराचे महान असे कार्य केले आहे. मराठी भाषा मराठी माणसाच्या अस्मितेचे संस्कृतीचे प्रतिक आहे. असे प्रतिपादन राज्य शासनाने अभिजात मराठी भाषा दर्जा समितीचे अध्यक्ष श्रीरामपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रंगनाथ पाठारे यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यिक रत्न या ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाट्न प्रसंगी अधक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ. पाठारे बोलत होते.
प्रा.डॉ. पाठारे पुढे म्हणाले की,मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना सुमारे २५०० वर्षाची परंपरा गृहीत धरली आहे. प्राचीन ग्रंथांतील विविध लिपीतील भाषा, व्यवहारातील व विविध कला प्रकारातील भाषा समाजघटकासमोर येण्यासाठी, मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी भाषेचे संवर्धन व अभिजाततेची ओळख आणि भाषेबाबत संशोधन याबाबत जनजागृती व्हावी, याकरिता दि.० ३ ते ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आणि मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०३ ते १० ऑक्टोबर २०२५ कालावधीत ग्रंथ प्रदर्शनचे आयोजन केले आहे हा स्तुत्य उपक्रम आहे. ग्रंथ प्रदर्शना चे उद्घाटन सौ.प्राची अमोल थिगळे,सुप्रसिध्द साहित्यिक/ कलाकार , यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक, समाजसेवक जालिंदर बोरुडे, सुधीर पाठक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले. आभार लिपिक संतोष कापसे यांनी मानले. या प्रसंगी शैलेश घेगडमल, ग्रंथमित्र अमोल इथापे,संतोष वाडेकर, वसंत कर्डीले, आदी मान्यवर व छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय, भूतकारवाडी, सावैडी अहिल्यानगर चे विद्यार्थी उपस्थित होते.




