Sunday, October 26, 2025

पक्षकारांना न्याय देण्याबरोबरच वकिलांकडून समाजकार्य घडते-मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव/प्रतिनीधी

अनेक वकिलांनी समाजाच्या सर्व क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. वकिली पेशातून पक्षकारांना न्याय देण्याबरोबरच समाजाचे प्रश्न सोडविण्याचे समाजकार्यही घडते असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले.

भाकपचे राज्य सेक्रेटरी ॲड. सुभाष लांडे पाटील यांचे चिरंजीव ॲड.रजत लांडे पाटील व ॲड.साहिल लांडे पाटील यांच्या वकिली व्यवसायातील पदार्पणानिमित्त सुरू केलेल्या लांडे पाटील लॉ फर्मच्या शेवगाव येथील कार्यालयाचे विजयादशमीला ( दि.२ ) माजी आमदार घुले , शेवगाव तालुका वकिल संघाचे तालुकाध्यक्ष ॲड. रामदास आगळे व कॉ. बन्सी सातपुते यांच्या हस्ते फीत कापून झाले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, माजी सभापती अरूण पाटील लांडे, जनशक्ती विकास आघाडीचे ॲड.शिवाजीराव काकडे, कॉ. स्मिता पानसरे, अमरावतीचे तहसिलदार संतोष काकडे, उपाध्यक्ष ॲड. मुनाफ शेख,  संजय कोळगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड.अविनाश मगरे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, पुरूषोत्तम कुंदे, प्रा. किसनराव माने, ॲड.अशोकराव फलके, भगवानराव गायकवाड, बबनराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.

माजी आमदार घुले पुढे म्हणाले की, ॲड. सुभाष लांडे पाटील यांनी वकिली व्यवसायाबरोबर कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेत काम करून शेवगावचे नाव राज्य व देशपातळीवर नेले. आता त्यांची दोन्ही मुले वकिली व्यवसायात पदार्पण करीत आहेत. वकिली व्यवसायातून गोरगरिबांचे प्रश्न न्यायालयातून सोडवता येतात.

या वेळी ॲड.शिवाजीराव काकडे, कॉ. बन्सी सातपुते, प्राचार्य शिवाजीराव देवढे यांचीही भाषणे झाली. या वेळी ॲड.विनायक आहेर, ॲड.लक्ष्मीकांत वेलदे, ॲड.मिनानाथ देहाडराय, ॲड. शंकर भालसिंग, ॲड.अमोल जाधव, ॲड.कारभारी गलांडे, ॲड.एल.एच. लांडे, विजयराव देशमुख, फुलचंद रोकडे, वंचितचे नेते प्रा. किसन चव्हाण, ॲड.अभय टाकसाळ, डॉ. संजय लड्डा, डॉ. मेधा कांबळे, बापूराव राशिनकर, ॲड. रामदास बुधवंत, ॲड. मनोहर थोरात, ॲड. शशिकांत भारस्कर, माजी सरपंच सतिश लांडे, वजीर पठाण, एकनाथ कुसळकर, दत्ता आरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. सुभाष लांडे पाटील यांनी केले. तर आभार ॲड. विशाल लांडे यांनी मानले.

*खासदार निलेश लंके यांची भेट…
अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीही लांडे पाटील लॉ फर्मला भेट देऊन चि. ॲड. रजत लांडे पाटील व ॲड. साहिल लांडे पाटील यांच्या वकिली व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!