नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थानच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून सोनई येथील पत्रकार विनायक दरंदले यांना उत्कृष्ट निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज सुडके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळकृष्ण महाराज सुडके यांनी सांगितले की,आध्यात्मिक कार्यात साहित्याचा असलेला सहभाग व वारकरी संप्रदायात नेवासे येथील पैसखांब मंदीरात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची केलेली निर्मिती लक्षात घेऊन सुडके महाराज संस्थानच्या वतीने साहित्य पुरस्कारांचे आयोजन केले होते. स्पर्धेकरीता वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातील १०५ पुस्तके आले होते. तज्ञ परिक्षकांनी परिक्षण करुन विजयादशमीच्या दिवशी काल गुरुवार दि.३ रोजी पुरस्कारासाठी साहित्यिकांची निवड केली आहे.
विभाग व पुरस्कार करीता निवड झालेल्या साहित्यिकांचे नावे याप्रमाणे…
*कवितासंग्रह विभाग:– चिबाड (इंद्रजित पाटील,बार्शी),हरवलाेय मी (किरण वैद्य, अहिल्यानगर),मृत्युंजय (वासुदेव खाेपडे,अकाेला).
*कथासंग्रह विभाग:– खरा वारस (हरिश्चंद्र पाटील,टेंभुर्णी), पाेलीस मन (अजित देशमुख,नवी मुंबई), ताटातूट (गाेकुळ गायकवाड,जामखेड),बेर (संध्या धर्माधिकारी,साेलापूर), इथे जन्मली माणुसकी (सत्यवान मंडलिक,सांगली).
*कादंबरी विभाग:-– डी.पी हाेता म्हणून (नितीन शिंदे,पुणे), देवमाणूस (बाळासाहेब गांगर्डे,राहाता), काळीजकळा (डाॅ.श्रीकांत पाटील,काेल्हापूर).
*बालसाहित्य विभाग:– सशा रे सशा तुझ्या तुपातल्या मिशा (लक्ष्मण शिवणेकर,मुंबई), आदर्श नगरीचा राजू (शंकर बाेईनवाड,नांदेड),
लहानपण ईचतुय मी (गंगा गवळी,नाशिक), बालमित्राची गाणी (प्रदीप पिंपळनेरकर,संभाजीनगर).
*चरित्र व आत्मचरित्र विभाग:–
दीपस्तंभ (शिवाजीराव बागल, पंढरपूर), मायंबा ते मुंबई (शिवाजी घुंगरड,बीड), विडीची माडी (पांडुरंग पवार,नाशिक).
*ललित,लेख व निबंध विभाग:– ब्युटी आॅफ लाईफ (आशा नेगी,पुणे),रॅडम (दिनेश फडतरे,सातारा), गुंफण (प्रा.रत्नमाला शिंदे स्वामी,रहिमतपूर), काेणतही पान (कविता मेहंदळे,पुणे).
*संत साहित्य विभाग:– सत्संग (तुळशीराम बाेबडे,अकोला), संत सावता माळी अभंग (डाॅ.सुवर्णा गुंड,साेलापूर), स्त्री संत जीवन आणि कार्य (विजयश्री सावजी,बुलढाणा),
जीवि जे गुंतले (नयन पऱ्हाड, अमरावती), विठू माझा लेकुरवाळा (सृष्टी राेकडे,लातूर)
*नाटक विभाग:– महापूजा (चूडाराम बल्हारपुरे,गडचिरोली), राजकारण घुसलय घरात (प्रभाकर शेळके, जालना), देव गेले दिगंतरा (नरेश पाटील,अलिबाग).
*पत्रकारिता पुरस्कार:– सोनई येथील पत्रकार विनायक दरंदले यांना उत्कृष्ट निर्भीड पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे.
संत, महंत व मान्यवरांच्या हस्ते मंगळवार दि.७ ऑक्टोबर रोजी.कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थान येथे पुरस्कारांचे वितरण होणार आहे असे सुडके महाराज यांनी सांगितले.




