नेवासा/प्रतिनिधी
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्ता तातडीने दुरुस्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पुढाकार घेत मंत्रालयात जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांची भेट घेतली आणि हा रस्ता म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळ आहे, असे सांगत चर्चा केली. याची दखल घेत मंत्री भोसलेंनी हे आदेश दिले.
मंत्री भोसले यांनी रस्ता परिस्थितीची गंभीर दखल घेत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची हमी घेतली. शिक्षण,आरोग्य, उद्योग आणि प्रशासनासाठी हजारो लोक दररोज याच मार्गाने प्रवास पावसामुळे आणि वाढत्या वाहतुकीमुळे रस्ता तुकड्यांत विखुरला आहे. रस्त्यावरून चालताना पुन्हा एकदा सुरक्षिततेचा श्वास घ्यावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे म्हणत आमदार लंघे यांनी दिलेला हा निर्धार नागरिकांसाठी दिलासा व विश्वास देणारा आहे.




