भेंडा/नेवासा
माणसाच्या जीवनात खेळा अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरावे लागते. त्यामुळे खिलाडूवृत्ती व सांघिक भावना वाढीला लागते. संघ म्हणून एकत्र असलो की अधिक मोठ मोठी कामे उभी राहतात असे प्रतिपादन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर जिल्हा आंतरमहाविद्यालयीन मुले-मुली मैदानी स्पर्धेचे श्री.घुले यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले,त्यावेळी बोलत होते. विश्वस्त
माजी आ. पांडुरंग अभंग,अड. देसाई देशमुख,काशिनाथ नवले,अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ, डॉ. नारायण म्हस्के, सहसचिव रवींद्र मोटे, अहिल्यानगर जिल्ह्याचे विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जाधव, सचिव डॉ.देवकाते, प्रा.सुनील जाधव, प्रा. संजय धोपावकर, प्रा. संजय गायकवाड, प्रा. विजय म्हस्के, डॉ. राहुल भोसले, डॉ. सुनील कुटे, डॉ. शरद मगर,गणेश गव्हाणे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, कला शाखा प्रमुख डॉ. काकासाहेब लांडे, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. केशव चेके आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले. खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. महाविद्यालयाचा विद्यापीठ खेळाडू निलेश लिपणे याने खेळाडूंना शपथ दिली. स्पर्धेमध्ये एकूण २२ प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ३७ महाविद्यालयांतील ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकास पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत आरबीएनबी महाविद्यालय,श्रीरामपूर यांना विजेतेपद तर संगमनेर।महाविद्यालय संगमनेर यांना उपविजेतेपद मिळाले.
शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्ता वाकचौरे, रघुनाथ मोरकर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अशोक सागडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्ता वाकचौरे यांनी आभार मानले.




