Monday, March 30, 2026

विठ्ठल अर्बनच्या कर्मचाऱ्यांना बोनस व मिठाईचे वाटप

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री विठ्ठल अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिपावली बोनस व मिठाईचे वाटप करण्यात आले.

दि.१९ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या कार्यालयात बोनस व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न झाला. ह.भ.प.सायकड महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत महंत यांच्या हस्ते श्री.विठ्ठल मूर्तीचे पूजन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन कृष्णा गव्हाणे, साहेबराव महाराज गव्हाणे, अंकुश महाराज कादे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश ससाणे, संचालक संजय गव्हाणे, कारभारी गरड,दत्तु आघाव, संतोष औताडे, चंद्रकांत साबळे, हौशीराम नवले, डॉ. मिसाळ, संदीप जावळे,काकासाहेब कावरे, श्रीमती मिसाळ , श्रीमती औताडे, श्रीमती निकम, श्रीमती साबळे, अभिजित पोटे, गणपतराव गव्हाणे, सुरेश भुसारी,श्री. खराडे, उत्तम देव्हढे, यादव कराळे, कावीळ तज्ञ सुनील वाबळे,किशोर वायकर, सुनिताताई गव्हाणे, काका नवले, सुनील दगडे,कृष्णा मंडलिक, ज्ञानेश्वर खुळे मेजर, बाळासाहेब तागड, शुभम आढागळे, भोसले मेजर,भगवान फुलारी, महेश गव्हाणे, प्रविण उंडे यांचेसह संस्थेचे संचालक, ठेवीदार कर्जदार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१८ मार्च २०१८ रोजी अवघ्या ७ सभासद यांनी ५ लाख रुपये भागभांडवल गुंतवणूक करून हि संस्था स्थापन केली होती. परंतु आज या संस्थेने सर्वांचा विस्वास संपादक केला आहे.आज रोजी या संस्थेच्या ५ कोटी रुपयांची उलाढाल असुन ३४०० सभासद आहेत. अगदी थोड्या कालावधीत ही संस्था नावारूपाला आली आहे. विठ्ठल अर्बन ही संस्था नेहमी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असते.यावेळी कु.प्रेरणा सुधीर चक्रणारायन या विद्यार्थ्यांनीने दहावी मधे चांगले मार्क्स मिळवून यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दिपक शिंदे यांची महसूल सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.
अमोल दरवडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संदीप जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!