नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर फळे भाजीपाला सहकारी खरेदी विक्री व कृषी पूरक संस्थेचे माजी चेअरमन व माळीचिंचोरा येथील जिल्हा परिषद प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त भास्करराव आबासाहेब कडू पाटील (वय ७९ वर्षे) यांचे रविवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी निधन झाले आहे.
त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,दोन मुली, सून, नातु जावई असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी केशवराव व विठ्ठलराव कडू यांचे बंधू तर प्रशांत कडू यांचे ते वडील होत.




