Wednesday, November 26, 2025

नागेबाबा मल्टिस्टेटच्या डिजिटल बँकिंग सुविधेचा शुभारंभ

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

नागेबाबा मल्टिस्टेटच्या डिजिटल बँकिंग सुविधेचा शुभारंभ श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी जी महाराज यांचे हस्ते करण्यात आला.

महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते  संस्थेच्या अहिल्यानगर येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमास 
नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, नागेबाबा संस्थांनचे अध्यक्ष शिवाजीराव तागड, डिझाईनर ज्ञानेश शिंदे,संजय मानवेलीकर, आबासाहेब काळे, सुनील, गव्हाणे,बाबासाहेब गायकवाड, ऍड.सुनील शिंदे, रंगनाथ गव्हाणे,सुभाष चौधरी, प्रशांत येमुल,  गणेश आर्टचे गणेश दळवी, कॉर्पोरेट ट्रेनर संदीप पाटील, बाळू महाराज कानडे, नागेबाबा मल्टिस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, सरव्यवस्थापक भरत दारुंटे  यांचेसह नागेबाबा परिवाराचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे याबाबद अधिक माहिती देताना म्हणाले की,नागेबाबा संस्थेमध्ये पेपरलेस बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांमुळे ग्राहकांना अधिक वेगवान, सुरक्षित व सुलभ बँकिंग अनुभव मिळत आहे.यात प्रामुख्याने डिजिटल खाते उघडणे,
मोबाईल बँकिंग, ई-स्टेटमेंट सेवा,व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग,डिजिटल री-केवायसी,डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज,डिजिटल नोटीस, ओटीपी बेस ट्रान्झिक्सन, ऑटो एआय कॉलिंग सुविधेचा समावेश आहे.

प्रमुख डिजिटल सेवा पुढीलप्रमाणे…

*1. डिजिटल खाते उघडणे :*
आता ग्राहकांना बँकेच्या शाखेत येण्याची गरज नाही. आधार, PAN व इतर कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून काही मिनिटांत डिजिटल खाते उघडता येते. ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आणि सुरक्षित आहे.

*2. मोबाईल बँकिंग :*
मोबाईलद्वारे 24×7 बॅलन्स तपासणी, पैसे पाठवणे-घेणे, बिल भरणे, रिचार्ज, स्टेटमेंट डाउनलोड अशा अनेक सेवा तत्काळ वापरता येतात. मोबाईल बँकिंगमुळे शाखेवर अवलंबून राहणे कमी होते.

*3. ई-स्टेटमेंट सेवा :*
ग्राहकांना त्यांची व्यवहार स्टेटमेंट्स ई-मेलवर किंवा अॅपमध्ये थेट मिळतात. यामुळे कागदी स्टेटमेंटची गरज संपते आणि माहिती जलद, सुरक्षित व संचयित स्वरूपात उपलब्ध होते.

*4. व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग :*
ग्राहक आता व्हॉट्सअॅपवरून बॅलन्स तपासणी, मिनी स्टेटमेंट, सेवा इत्यादी सुविधा सहज मिळवू शकतात. या सेवेमुळे सामान्य ग्राहकांनाही बँकिंग अधिक सोपे व सहज उपलब्ध झाले आहे. तरी सभासदांनी त्याला आपल्या खात्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा.

*5. डिजिटल Re KYC :*
ग्राहकांच्या ओळख पडताळणीसाठी आधुनिक डिजिटल KYC प्रक्रिया वापरात आहे. व्हिडीओ KYC किंवा ऑनलाइन डॉक्युमेंट पडताळणीद्वारे खाते अपडेट करणे पूर्वीपेक्षा अधिक वेगवान व सुरक्षित झाले आहे.
ज्या खातेदारांनी रिकेवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी.

*6. डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज :*
ग्राहकांची आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे संग्रहित केली जातात. ही सुविधा दस्तऐवज पुन्हा पुन्हा जमा करण्याची गरज कमी करते आणि पारदर्शक, त्रुटीविरहित प्रक्रिया सुनिश्चित करते.

*7) डिजिटल नोटीस :* आपल्या सर्व कर्जाची माहिती व हप्त्याची पूर्वकल्पना व सोनेतारण लिलाव नोटीस आपल्याला व्हाट्स ॲप द्वारे मिळण्याची सुविधा चालू झाली आहे.

*8) OTP Base Transaction:* या सुविधा अंतर्गत व्यवहार अतिशय पारदर्शकपणे होण्यासाठी खातेदार यांचे क्षणात व्हेरिफिकेशन केले जाते.

*9) Auto AI Calling:* AI तंत्रज्ञान वापरून स्वयंचलितपणे ग्राहकांना केलेला कॉल, ज्यात सिस्टम स्वतः बोलते, प्रश्न विचारते, उत्तर देऊन माहिती नोंदवते.

टिप -सर्व सभासदांनी वरील सुविधांचा लाभ घ्यावा. त्यासाठी आपला मोबाईल नंबर अपडेट करणे गरजेचे आहे. त्वरित आपण शाखेत जाऊन नंबर अपडेट करावा. धन्यवाद🙏🏻

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!